जानेवारीच्या 15 दिवसांनंतरही लाडकी बहिण योजनेच्या हप्त्याबाबत माहिती नाही, महिलांच्या प्रतीक्षेला किती दिवस?
लाडकी बहीण योजना: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेली योजना. महायुती सरकारच्या आश्वासनांमुळे महिलांच्या मनात योजनेविषयी मोठी आशा निर्माण झाली. निवडणुकीनंतर महिलांच्या खात्यात जुलै ते डिसेंबर पर्यंत 1500 रुपये प्रति महिना या दराने एकत्रित 9000 रुपये जमा झाले. राज्यातील 2.5 कोटी महिलांना याचा लाभ मिळाला.
जानेवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा: जानेवारीच्या 15 दिवसांनंतरही महिलांना योजनेच्या पुढील हप्त्याबाबत कुठलीही ठोस माहिती मिळालेली नाही. महिलांच्या खात्यात 2100 रुपयांचा हप्ता जमा होईल का, याविषयीही संभ्रम कायम आहे.
मार्चमध्ये होऊ शकतो निर्णय: जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते की, मार्च महिन्यानंतरच हप्त्यात वाढ होईल. अर्थसंकल्पीय अधिवेशनात यावर विचार होऊन सुधारणा होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बजेटमध्ये यावर विचार केला जाईल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे 2100 रुपये मिळण्याबाबतचा निर्णय मार्च महिन्यात अपेक्षित आहे.
महिलांच्या प्रतीक्षेला किती वेळ: महिलांना सध्या पुढील हप्त्याच्या प्रतीक्षेसाठी अधिक काळ थांबावे लागेल, अशी स्थिती आहे. अर्थसंकल्पानंतर योजनेच्या पुढील टप्प्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.